पत्नीचा छळ 
महाराष्ट्र

आधी दिले चटके, नंतर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची धमकी; पैशांसाठी पत्नीचा छळ

आधी दिले चटके, नंतर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची धमकी; पैशांसाठी पत्नीचा छळ

Rajesh Sonwane

जळगाव : दुकान घेण्यासाठी माहेराहून २५ लाख रुपये आणावे नाहीतर, अंगावर रॉकेल टाकून पेटवून मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-crime-news-Marital-harassment-for-money)

राखी राजेश तलरेजा (वय ३८, रा. गणेशनगर) यांचा विवाह मलापुर (ता. बुलडाणा) येथील राजेश रामचंद तलरेजा यांच्याशी (वर्ष २०१२) मध्ये रितीरिवाजानुसार झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती राजेश तलरेजा याने दुकान घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने विवाहितेला चटके देण्यास सुरवात केली. पैसे आणले नाही तर अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळून टाकण्याची धमकी दिली.

दागिने काढून घेतले

पतीचे मोठे तीन भाऊ, पुतण्या आणि चुलत जेठ यांनी देखील मारहाण केली. यात विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती राजेश रामचंद्र तलरेजा, जेठ अमर तलरेजा, विनोद तलरेजा, मुकेश तलरेजा, पुतण्या अजय मुकेश तलरेजा सर्व (रा. छोटी सिंधी कॉलनी वाटर सप्लाय, कंवर नगर, मलकापूर जि. बुलडाणा) आणि चुलत जेठ सुभाष तलरेजा (रा. बुलडाणा) यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

SCROLL FOR NEXT