Murder Case 
महाराष्ट्र

चिमुकल्‍यांना उचलले अन्‌ फेकले विहिरीत; चुलत भावाचे रागातून कृत्‍य

चिमुकल्‍यांना उचलले अन्‌ फेकले विहिरीत; चुलत भावाचे रागातून कृत्‍य

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : चुंचाळे (ता. यावल) येथील दोघा अल्पवयीन भावंडांचे मृतदेह शेतातील विहिरीत आढळले होते. यात संशयीत म्‍हणून ताब्‍यात घेतलेल्‍या चुलत भावानेच चिमुकल्या पुतण्यांना विहिरीत फेकल्याचा उलगडा पोलीस तपासात निष्‍पन्‍न झाला आहे. (jalgaon-news-crime-news-little-child-murder-Cousin-brother)

दोन अल्‍पवयीन भावंडे अचानक गायब झाली होती. दुसऱ्या दिवशी दोन्‍ही भावंडाचे मृतदेह शेतातील विहिरीत सापडले होते. हत्याकांडात हितेश रवींद्र सावळे (वय 5) व हितेश रवींद्र सावळे (वय 5) या चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दरम्‍यान पोलिसांनी मनोरूग्‍ण असलेल्‍या चुलत भावाला संशयीत म्‍हणुन ताब्‍यात घेतले होते. चौकशीअंती गुन्ह्याचा उलगडा करत चुलत भाऊ यात आरोपी ठरला आहे. चुलत भावा असलेल्‍या आरोपीला कुटुंबात मिळणार्‍या सापत्न वागणुकीमुळे त्याने मुलांना विहिरीत फेकल्याची कबुली दिली. यावल पोलिसांनी आरोपी निलेश सावळे (वय ३२) यास अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोळी दिली नाही त्‍यात मुलांनी दगड मारल्‍याचा राग

शेतीचे उत्पन्न दाखवले जात नाही. नोकरासारखी वागणूक मिळते. बुधवारी सर्वजण जेवायला बसलो तेव्हा मला एकच पोळी दिली. इतर सर्व पोटभर जेवले; दुपारी दोघा पोरांना जेऊ घातले. मला विचारले देखील नाही. याचा राग मनात होता. बुधवारी शेतातील विहिरीवर बसलो असताना दोन्ही मुले विहिरीत दगड टाकत होते. मी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी मला दगड मारला, त्यामुळे संतापात दोघांना विहिरीत टाकल्‍याची कबुली संशयित नीलेश सावळे याने पोलिसांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT