Murder case 
महाराष्ट्र

Breaking..जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून

जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव शहरातील सलग दुसऱ्या दिवसाची पहाट खुनाच्या थराराने उजाळली. निमखेडी शिवार परिसरात जन्मदात्याचा खून झाल्यानंतर आज शहरात पुन्हा एक नवीन खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-crime-news-Jalgaon-fight-case-for-the-second-day-in-a-row)

शहरातील घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आंबेडकरनगराच्या बाजूच्या परिसरातील राजू पंडित सोनवणे या व्यक्तीची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे

आईला गेले होते भेटायला

राजू सोनवणे हे पत्नी व दोन मुले यांच्यासोबत लक्ष्मीनगरात वास्तव्यस होते. आंबेडकर नगर परिसरात राजू यांच्या आई राहत होते. आईला भेटण्यासाठी रविवारी गेले असता रात्री तेथेच मुक्कमी राहिले. वरच्या मजल्यावर ते झोपले होते. सकाळी खाली आले नाही म्हणून आईने मुलाला वर पाहण्यासाठी पाठविले. यावेळी सदर प्रकार उघळकिस आला.

सलग दूसरा दिवस खुनाचा

निमखेडी रोड परिसरात एका व्यक्तीला कौटुंबिक वादातून त्याच्याच दोन्ही मुलांनी संपवण्याची भयंकर घटना घडली होती. याप्रकरणी दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. खुद्द जन्मदात्या बापाचा खून करण्याच्या या कृत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान यानंतर आज शहरात पुन्हा एक खून झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Ball Weight: तुम्हाला माहितीये का क्रिकेट बॉलचं वजन काय असतं?

LIC Pension Scheme: तुम्हालाही महिन्याला १० हजारांची पेन्शन मिळणार, LIC ची जबरदस्त योजना, फक्त एकदाच गुंतवा इतके पैसे

5 Silent Signs Of Kidney Damage : सकाळी शरीरात दिसणाऱ्या या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, किडनी होऊ शकते फेल

Crime: अपहरण करून तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर यांना ईडीचे समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT