Crime News 
महाराष्ट्र

पत्‍नीशी अनैतिक संबंध..दारू पाजली अन्‌ मंदिराजवळ नेत डोक्‍यात घातला घाव

पत्‍नीशी अनैतिक संबंध..दारू पाजली अन्‌ मंदिराजवळ नेत डोक्‍यात घातला घाव

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मजुरीच्‍या कामानिमित्‍ताने दोन परिवार गावात आलेले. सालदारकीला वर्ष झाले असतानाच आपल्‍या पत्‍नीशी अनैतिक संबंध असल्‍याचा संशय आला. यानंतर संबंधीत इसमाला अगोदर दारू पाजली. यानंतर मंदिराजवळ नेत डोक्‍यात घाव घालत खून केल्‍याची घटना सावखेडा येथे घडली. (jalgaon-news-crime-news-Immoral-relationship-with-his-wife-and-husband-heat-porson)

सावखेडा येथे झालेल्‍या घटनेत श्रावण सोनवणे याचा खून झाला आहे. सावखेड्याचे पोलीस पाटील चंद्रकांत सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार सावखेड्यातील उत्तम चौधरी या शेतकऱ्याकडे भैय्या मदन भिलाला पवार (रा. मडगाव, मध्यप्रदेश) हा वर्षभरापासून सालदार आहे. तर याच गावात कुटुंबासह राहणारा शांताराम सोनवणे शेतमजुरी करतो. महिनाभरापासून आलेला त्याचा धाकटा भाऊ श्रावण सोनवणे (वय ४०) हा देखील मजुरी करत होता.

खूनाची कबुली अन्‌ कारणही दिले

श्रावण सोनवणे अविवाहित होता. बुधवारी रात्री उत्तम चौधरी यांचा मुलगा सुजित पोलीस पाटील चंद्रकांत सोनवणे यांच्या घरी त्यांना बोलवायला जात उत्तम चौधरी यांच्या घरी घेऊन गेला. त्यावेळी तेथे भैय्या भिलाला उभा होता. त्याच्या कपड्यावर पडलेले रक्ताचे डाग पाहून विचारणा केली असता त्याने सांगितले की, श्रावण सोनवणे याचे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. दोन वेळा त्याला माझ्या पत्नीसोबत पाहिले होते. त्यामुळे आज मी त्याला दारू पाजून काळभैरव मंदिराजवळ नेले आणि तेथे त्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली.

पोलिसांना कळविली घटना

भिलाला याने सांगितल्‍यानंतर काळभैरव मंदिराजवळ गेल्यावर तेथे श्रावण सोनवणे मृतावस्थेत दिसला. कोणत्या हत्याराने श्रावण सोनवणे याला मारले याची माहिती मात्र त्यावेळी भिलाला याने पोलीस पाटलांना दिली नाही. यानंतर तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी गेले आणि पुढील कारवाई केली. पोलीस पाटील चंद्रकांत सोनवणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी भैया भिलाला विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT