अत्‍याचार 
महाराष्ट्र

मुलाचे अपहरण, पतीला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्‍याचार

मुलाचे अपहरण, पतीला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्‍याचार

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : भुसावळ शहरातील विवाहितेला मुलाचे अपहरण व पतीला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या विरोधात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्‍यास अटक करण्यात आली आहे. (jalgaon-news-crime-news-bhusawal-married-women-threatening-kill-her-husband-and-child-incident)

भुसावळ शहरात तीस वर्षीय विवाहिता पती व मुलासह वास्‍तव्‍यास आहे. गतवर्षी २०२० च्या रमजान महिन्यापासून ते आतापर्यंत संशयित आरोपी शेख जमशेद शेख शमीम उर्फ जम्मूई याने विवाहितेला तिच्या मुलाचे अपहरण व पतीला ठार मारण्याची धमकी दिली. धमकी देत सदर महिलेवर दबाव आणून तिच्‍यावर वारंवार अत्याचार केले.

पतीने दिला धीर

मुलाच्या अपहरणाची व पतीस ठार मारण्याची धमकी दिली असल्याने तिने घाबरून त्यावेळी तक्रार केली नाही. परंतु तिच्या पतीने मनातील भीती दूर केली. यानंतर विवाहित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख जमशेद शेख शमीम याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Tips : इंटिरिअर डिझायनरही सांगतात या भन्नाट होम डेकोर टिप्स!

Maharashtra News Live Update: डोंबिवली मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्मार्ट मीटरच्या अफवांवर महावितरणचे स्पष्टीकरण; नेमकं काय सांगितलं?

VIRAL VIDEO: वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला अन्...हायवेवरचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Makeup Tips: घाम किंवा पावसामुळे मेकअप होणार नाही खराब! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT