Crime News Saam tv
महाराष्ट्र

भडगावच्या विवाहितेवर नाशिकमध्ये अत्याचार; माहेरी तक्रारीने फुटले सासरच्यांच्या कृत्यांचे बिंग

भडगावच्या विवाहितेवर नाशिकमध्ये अत्याचार; माहेरी आल्यानंतर तक्रारीने फुटले सासरच्यांच्या कृत्यांचे बिंग

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : सासरा व पतीच्या मावसभावने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, तसेच इतरांशीही तसेच संबंध ठेवण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून दबाव होता, असा आरोप करत पांढरद (ता. भडगाव) येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून भडगाव (Bhadgaon) पोलिस ठाण्यात बलात्कारासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सासरचे सर्व जण नाशिक येथील असून, या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे. (jalgaon news crime news Atrocities on married women of Bhadgaon in Nashik)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार पांढरद येथील विवाहितेचा नाशिक येथील पुरुषोत्तम देवरे (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर पती अश्लील व्हिडिओ दाखवून विवाहितेला त्याप्रमाणेच कृत्य करण्याचा आग्रह धरत होता. त्याला विवाहितेने विरोध केला. ही बाब घरात समजल्यावर त्यांनीही ‘करावेच लागेल, तू बाहेरच्या लोकांशी शारीरिक संबंध ठेवले तर माहेरच्या लोकांनाही पैसे देऊ,’ असे सांगितले. जानेवारी महिन्यात दुपारी दोनच्या सुमारास घरी सासू, दोन्ही नणंदा असताना सासरे विवाहितेच्या बेडरूममधे आले. विवाहिता झोपेत असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, तसेच तोंडात रुमाल कोंबला. तेवढ्यात पतीचा मावसभाऊही तेथे आला. त्यानेही बळजबरीने शारीरिक संबंध केले. याबाबत पतीकडे तक्रार केल्यानंतर पतीने दुर्लक्ष करत त्यात काय बिघडले, असे सांगितले.

भडगाव पोलिसात तक्रार

शिवाय घरात अनेक बाहेरचे लोक यायचे. सासूच्या बेडरूममध्ये जायचे, एके दिवशी सासूच्या बेडरूमची साफसफाई करताना तेथे अश्लील अल्बम आढळून आले. ही बाब माहेरी आल्यानंतर संबंधित विवाहितेने घरच्यांना सांगितली. याशिवाय गाडीसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून तगादा सुरू होता. त्यावरून विवाहितेच्या तक्रारीवरून सासरे सुधाकर देवरे, मावस दीर मिलिंद पाटील, पती महेश ऊर्फ पुरुषोत्तम देवरे, सासू सरला देवरे, नणंदा दक्षा देवरे, प्रतीक्षा देवरे (सर्व रा. पाथर्डी फाटा, नाशिक), तसेच विवाहासाठी मध्यस्थी करणारे सुभाष पाटील (रा. मुंबई) यांनीही ‘सासरचे मंडळी जे करायला सांगत आहेत, ते कर. ते तुझ्या घरच्यांना पैसे देतील,’ असे सांगायचे. त्यामुळे त्यांच्यावरही भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश वाघमारे तपास करीत आहेत.

रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

सदर घटनेने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. ‘आम्ही सर्व तेच काम करतो, तू पण ते कर’ असा दबाव विवाहितेच्या सासरच्या मंडळींकडून होता. याशिवाय घरी सातत्याने बाहेरच्या व्यक्तीही येत असत, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केल्यास त्यांच्या हाती बरेच काही लागू शकते अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT