Fraud Saam tv
महाराष्ट्र

खरे दोन लाख घेवुन दिल्या मुलांच्या खेळण्यातील नोटा; तिप्पट पैसे करुन देण्याचे आमीष

खरे दोन लाख घेवुन दिल्या ‘चिल्ड्रेन बँकेच्या’ नोटा; तिप्पट पैसे करुन देण्याचे आमीष

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दोन लाखांच्या मोबदल्यात सहा लांखांच्या चलनी नोटा (बनावट) देण्याचे आमीष दाखवत धुळ्यातील गृहस्थाला जळगावला बोलावुन गंडवण्यात आल्याची घटना घडली. देान लाखांच्या खर्या नोटा घेवुन त्या बदल्यात लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांचे बंडल देत फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून एमआयडीसी पोलिसांत (Police) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news crime Fraud by the lure of triple pay)

एमआयडीसी पोलीसांत दाखल माहितीनुसार, नथ्थू काशीनाथ कोळी (वय-४६ रा. बाळापूर फागणे ता.जि. धुळे) यांच्यासह वास्तव्याला आहेत. ते, खासगी प्रवासी वाहतुक वाहनावंर चालक म्हणुन कार्यरत आहेत. एकेदिवशी त्यांचा मित्र वाल्मीक शिवाजी पाटिल हा त्यांच्या घरी आला. व त्याने सांगीतले की, पैसे तिप्पट करुन देणार्या व्यक्तीची माहिती भडगाव सिव्हील हॉस्पीटलच्या (Hospital) ॲम्बुलन्स चालक भैय्या महाजन याचे कडे आहे. असे सांगत त्याची भेट बाबा पेट्रेालपंपावर घालून दिली हेाती.दहा हजारांचे तीस हजार करुन देण्याचे आमीष दाखवत नथ्थु कोळी यांचा विश्वास संपादन करण्यात आला. धुळ्याहून (Dhule) भडगाव तेथून जळगाव (Jalgaon) परत भुसावळ येथे घेवुन जात कोळी यांना (५००, २०० आणि १०० दराच्या) सतराशे रुपयांच्या बनावट नोटांचे सँम्पल देण्यात आले. नोटा खर्या असल्याची खात्री झाल्याने नथ्थु कोळी यांनी पैसे तिप्पट करण्यास सहमती दर्शवली.

सिनेस्टाईल झाली डील..

नोटांची पसंती पडल्यावर तिप्पट नोटा देणार्याने देान लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तरच तिप्पट नोटा भेटतील अशी अट घातली. म्हणुन भैय्या महाजनच्या माध्यमातून जळगावच्या अजिंठा चौकात संबधीत मोबाईल नंबर धारक (९१७५०८७३२९) व्यक्तीने पैसे घेवुन बोलावले. शुक्रवार(ता.१८) रेाजी नथ्थु कोळी येथे पोहचल्यावर सकाळी नऊ वाजता होंडा शेारुमच्या बाहेर एक आनोळखी व्यक्ती काळी बॅग घेवुन आला. व त्याने देान लाख घेवुन त्या बदल्यात काळ्या रंगाची बॅग कोळी यांच्या हातात दिली. त्यात पाचशे रुपये दराच्या नोटांचे बंडल उघडून दाखवत लवकर निघा येथून असे म्हणत पिटाळून लावले.

अन्‌ झोडून घेतले तोंड

दोन लाख रुपयांचे सहा लाख रुपये भेटल्याने वायुवेगाने नथ्थु महाजन घराच्या दिशेने धावत सुटले. मात्र, थोडे अंतर गेल्यावर त्यांनी खात्री करावी म्हणुन एका ठिकाणी थांबत नोटांची तपासणी केली असता. पाचशे रुपयाच्या दराच्या या नोटांच्या बंडल मध्ये वर आणि खालीच खर्या नोटा होत्या..मध्ये लहानमुलांच्या खेळण्यातील नोटांची रद्दी असल्याचे दिसताच आपली फसवणुक झाली म्हणुन नथ्थु कोळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यावरुन भैय्या महाजन (पुर्ण नाव माहित नाही), एक अनोळखी व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक धारक ९१७५०८७३२९ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

SCROLL FOR NEXT