कामबंद 
महाराष्ट्र

स्‍वच्‍छतेचा तिढा..पगार नसल्‍याने सफाई कामगारांचे कामबंद

स्‍वच्‍छतेचा तिढा..पगार नसल्‍याने सफाई कामगारांचे कामबंद

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : ‘वॉटरग्रेस’चा सफाई मक्ता अनेक कारणांवरून वादात अडकलेला असताना आता काही दिवसांपासून सफाई कामगारांनी काम बंद केले आहे, तर दुसरीकडे घंटागाड्यांच्या नियमित फेऱ्याही घटल्या आहेत. कामगारांचे वेतनच होत नसल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे. (jalgaon-news-corporation-Sweeping-of-cleaners-due-to-lack-of-cleanliness)

जळगाव शहरातील साफसफाईचा ठेका देण्यात आलेल्या वॉटर ग्रेस कंपनीच्या घंटागाडीवरील चालकांचे पगार रखडले आहेत. यामुळे सर्व घंटागाडी चालकांनी आज काम बंद आंदोलन पुकारले आहे. अगोदरच साथरोगांची साथ सुरू असताना घंटागाडी चालकांनी पुकारलेल्‍या कामबंद आंदोलनामुळे शहरातील स्‍वच्‍छतेचा बोजबारा उडाला आहे.

चालकांना निम्‍मेच पगार तर हेल्‍पर बिनपगारी

गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्यांच्या फेऱ्याही नियमित होत नसून सफाई कामगार दोन महिन्‍यांपासून कामगारांना पगार मिळाला नसल्‍याचे कामगारांनी सांगितले. तसेच वेळेवर पगार होत नाही, करारानुसार ४८९ रोज असताना २५० रोज दिला जातो. तर हेल्परला पगार नसल्‍याने आज ८५ चालक आणि ८५ हेल्पर यांनी आंदोलन पुकारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT