Corona vaccination center 
महाराष्ट्र

लसीकरण केंद्र दोन दिवस बंद; जळगावात करावी लागतेच प्रतिक्षा

लसीकरण केंद्र दोन दिवस बंद; जळगावात करावी लागतेच प्रतिक्षा

संजय महाजन

जळगाव : कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सुरू असलेल्‍या लसीकरण मोहिमेचा बोजबारा उडत आहे. जिल्‍ह्यात लसींचा साठा संपला असून पुन्‍हा लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. शहरातील सर्वच केंद्र आज बंद असून शुक्रवारीच लसीकरण केंद्र उडघण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. (jalgaon-news-corona-vaccination-center-closed-next-two-days-people-waiting)

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधातील लसीकरणास सुरवात झाली असली तरी आतापर्यंत नऊ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ४४ ते ४५ लाखांपर्यंत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरी युवकांना पुरेशा प्रमाणात लसीकरण झालेले नाही. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे कोरोना लसीकरण होय. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले त्यांना कोरोनापासून काहीअंशी धोका नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते.

पहिल्‍या डोसवाल्‍यांना प्रतिक्षाच

शहरातील महापालिकेची सर्व केंद्र आज बंद आहेत. जिल्ह्यात ३५० वर केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यातुलनेत लसींचा साठा अगदीच मुबलक उपलब्ध होत आहेत. त्यातच जो साठा येत आहे; तो दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात येत असल्याने पहिला डोस घेणाऱ्यांना वेटींगलाच थांबावे लागत आहे. त्यामुळे पहिला डोस सुरू झाल्यानंतर केंद्रांवर पुन्हा गर्दी वाढणार आहे.

अजून दोन दिवस केंद्र बंद

सोमवारी महापालिकेचे केंद्रांवर लसीकरण सुरू होते. मात्र, लस नसल्याने मंगळवारी बंद ठेवण्यात आले. हिच परिस्‍थीती आज देखील असल्‍याने केंद्र बंद आहेत. शिवाय गुरूवारी लसींचा स्‍टॉक मिळण्याची शक्यता कमीच असल्याने लसीकरणासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT