Corona Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: तीन दिवसांत रुग्णसंख्या २५वर; कोरोनाचा आलेख वाढतोय

तीन दिवसांत रुग्णसंख्या २५वर; कोरोनाचा आलेख वाढतोय

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना, जळगाव जिल्ह्यातही रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत सक्रिय रुग्णांची (Jalgaon News) संख्या २५ वर पोचली आहे. (jalgaon news corona update 25 patients in three days)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. तीन दिवसांपासून ही संख्या चार, पाचपेक्षा जास्त आढळून येत आहे. मंगळवारी (ता. २१) एकाच दिवसात ७ रुग्ण समोर आल्यानंतर बुधवार (ता. २२)च्या अहवालातही नव्या ८ रुग्णांची नोंद झाली. त्यात जळगाव शहरात १, जळगाव ग्रामीणला १, भुसावळ (Bhusawal) व चोपडा तालुक्यात प्रत्येकी २, धरणगावला १, असे ८ रुग्ण समोर आले. तर दिवसभरात ७ रुग्ण बरेही झाले. त्यामुळे सध्या सक्रिय रुग्णसंख्या २५ झाली आहे.

सर्व रुग्ण घरीच

गेल्या आठवडाभरात दररोज रुग्ण समोर येत असले, तरी या रुग्णांमध्ये अगदीच सौम्य लक्षणे आहेत. सद्य:स्थितीत सक्रिय असलेले सर्व २५ रुग्ण घरीच विलगीकरणात असून, उपचार घेत आहेत. एकही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नसले, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT