Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Corona Update: जळगावात पुन्‍हा आढळला कोरोनाचा रुग्ण

जळगावात पुन्‍हा आढळला कोरोनाचा रुग्ण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील दोन आठवड्यांपासून कोरोनामुक्‍त झालेल्‍या जळगाव शहरात कोरोनाचा एक नवा रुग्ण आढळून आला आहे. यामुळे कोरोना (Corona) वाढीची धास्‍ती वाटत असून नागरीकांनी काळजी घेणे हा सुरक्षित उपाय आहे. (jalgaon news Corona patient found again in Jalgaon)

देशात काही भागात कोरोना वाढीची संख्‍या येत आहे. या दरम्‍यान चौथ्या लाटेची चर्चा सुरू असताना जिल्ह्यात नवा रुग्ण आढळून आला आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. परंतु, बुधवारी झालेल्‍या ३४ आरटीपीसीआर चाचण्या तर ७१ अँटिजन चाचण्यांमध्‍ये एक नवा रुग्ण आढळून आला आहे.

चाचण्या वाढवण्यासाठी प्रयत्‍न

काही महिन्यांपूर्वी कोरोनाची भीती असल्याने नागरिक साधा खोकला आणि ताप असला तरी कोरोनाची चाचणी करण्यासाठी येत होते. परंतु, कोरोनामुक्‍त झाल्‍यानंतर नागरीक अगदी बिनधास्‍त झाले होते. परंतु, आता चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला चाचण्या वाढवाव्‍या लागणार आहेत. नागरीक स्वत: चाचणीसाठी येत नसल्‍याची चित्र सध्‍यातरी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT