Corona Saam tv
महाराष्ट्र

सावधान..जळगाव जिल्‍ह्यात कोरोना वाढतोय; एकाच दिवसात सहा बाधित

सावधान..जळगाव जिल्‍ह्यात कोरोना वाढतोय; एकाच दिवसात सहा बाधित

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात नव्याने सहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्‍या १६ कोरोनाबाधित रुग्ण असून ते कोवीड रूग्णालयात (Hospital) उपचार घेत आहेत. (Corona is growing in Jalgaon district Infected six in a single day)

राज्‍यात कोरोना (Corona) बाधितांचा आकडा वाढत आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात देखील कोरोना बाधित आढळून येत आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना जवळपास आटोक्यात आला होता. आता कोरोनाच्या नव्या लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या १६ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्‍ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार बाधित

जळगाव जिल्‍ह्यात मंगळवारी सहा बाधित आढळून आले. यात (Bhusawal) भुसावळ तालुक्यातून ३, चोपडा तालुका- १, यावल- २ असे एकूण ६ कोराना बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ५१ हजार ५७५ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९ ६८ रूग्ण बरे होवून घरी परतले असल्‍याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT