Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: विरोध संपविण्यासाठी आपल्याला अटक करण्याचे षडयंत्र; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

विरोध संपविण्यासाठी आपल्याला अटक करण्याचे षडयंत्र; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात आपण एकमेव विरोधक आहोत, त्यामुळे विरोध संपवून टाकण्यासाठी गुन्ह्यात अडकवून आपल्याला ऐनकेन प्रकारे अटक करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली असल्याचे (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले. (Letest Marathi News)

जिल्हा दूध संघातील (Jalgaon) लोणी व दूध भुकटी चोरीप्रकरणी संघाच्या चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या लेखी तक्रार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांनी पोलिस (Police) ठाण्याबाहेर आंदोलन केले. कोणाचा तरी दबाव असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. याच दबावातून आपल्याला कोणत्याही गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली आहे.

जामनेर रहिवासी पोलिसाच्‍या माध्‍यमातून षडयंत्र

जामनेर (Jamner) येथील रहिवासी असलेल्या ‘एलसीबी‘च्या पोलिसाच्या माध्यमातून षडयंत्र रचण्यात येत असून, त्यांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली असल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी (ता. १५) घेतलेल्या पत्रकार परिषदेतही खडसे यांना कारागृहात जावे लागणार आहे, असा आपल्याबाबत उल्लेख केला होता. त्यामुळे त्याच अनुषंगाने हे षडयंत्र असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याबाबत आपण माहिती घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन लावला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असेही आमदार खडसे यांनी सांगितले. आपल्याला अटक करून जिल्ह्यातील राजकीय विरोध संपविण्याची ही खेळी असल्याचे मतही खडसे यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT