nmu 
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना दिलासा..कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक शुल्कात सवलत

विद्यार्थ्यांना दिलासा..कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक शुल्कात सवलत

Rajesh Sonwane

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविडच्या पार्श्‍वभूमीवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी विविध शुल्कात सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. (jalgaon-news-Consolation-to-the-students-Concession-tuition-fees-on-the-covid-jalgaon-university)

पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय, तसेच मुंबई येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव यांच्या निर्देशान्वये हा निर्णय घेण्यात आला. यात, जिमखाना शुल्क, आपत्कालीन व्यवस्थापन शुल्क, विद्यार्थी उपक्रम शुल्क, गरीब विद्यार्थी सहाय्यता निधी, अश्‍वमेध शुल्क, स्नेहसंमेलन शुल्क, व्यक्तिमत्त्व विकास व व्यवसाय रोजगार मार्गदर्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे, तर ग्रंथालय शुल्क आणि प्रयोगशाळा शुल्क (विज्ञान) ५० टक्के माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

‘त्या’ विद्यर्थ्यांचे शुल्क पूर्ण माफ

ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मृत झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचासुद्धा निर्णय घेण्यात आला आहे. ही सवलत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी लागू असेल. या शुल्क माफीव्यतिरिक्त इतर शुल्क विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार आकारण्यात येईल.

शुल्क भरण्यास सवलत

विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क तीन हप्त्यांत भरण्याचीसुद्धा सवलत देण्यात आली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकडे थकीत शुल्क असल्यास परीक्षेचा अर्ज अडविण्यात येऊ नये, असेही निर्देश महाविद्यालयांना विद्यापीठाने पत्राद्वारे दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT