eknath khadse 
महाराष्ट्र

कॉंग्रेसचे उमेदवारही खडसे ठरवितात..कॉंग्रेसच्‍याच पदाधिकारीकडून आरोप

कॉंग्रेसचे उमेदवारही खडसे ठरवितात..कॉंग्रेसच्‍याच पदाधिकारीकडून आरोप

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्‍‍हा बँक संचालक मंडळाच्‍या निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांनी नाट्यमय पध्दतीत माघार घेतली. यानंतर तीनही प्रमुख पक्षातील नाराज कार्यकत्‍र्यांनी एकत्र येत शेतकरी विकास पॅनल तयार करत भाजप, राष्‍ट्रवादी व कॉंग्रेसचे कार्यकर्ते या पॅनलखाली निवडणूक लढविणार असल्‍याचे कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (jalgaon-news-Congress-candidates-also-decide-eknath-Khadse-Allegations-from-Congress-leader)

जिल्‍हा परिषदेतील शिक्षण व आरोग्‍य समिती सभापती दालनात सदर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला भाजपचे कार्यकर्ते तथा शिक्षण सभापती रवींद्र पाटील, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हा समन्‍वयक विकास पवार, विकास वाघ आदी उपस्‍थीत होते. या तीनही पदाधिकारींनी जिल्‍हा बँक निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलखाली उमेदवारी करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले असून, याकरीता मोटारसायकल हे चिन्‍ह दिले आहे.

प्रमुखांना डावलले

जिल्‍हा बँक निवडणूकीत राष्‍ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाने प्रमुख उमेदवारांना उमेदवारी न देता जे पक्षात देखील नव्‍हते अशांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने सर्व उमेदवारांना माघार घ्यायला सांगितली. तुल्‍यबळ उमेदवार असताना कॉंग्रेसशी काहीही संबंध नसताना शैलजा निकम यांना उमेदवारी दिली. अर्थात सामान्‍य कार्यकत्‍र्यांना स्‍थान दिले जात नाही. मंत्री, आमदार यांना अनेक कामे असताना केवळ खुर्ची हवी म्‍हणून जिल्‍हा बँकेत देखील उमेदवारी करत आहेत. यामुळे नाराज असलेल्‍या उमेदवारांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केल्‍याचे यावेळी स्‍पष्‍ट केले.

खडसेंना आपल्‍या मर्जी प्रमाणे हवे

कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व जिल्‍हाध्‍यक्ष प्रदीप पवार यांनी कॉंग्रेसची उमेदवारी शैलजा निकम व विनोद पाटील यांना दिली. मुळात कॉंग्रेसचे उमेदवार देखील एकनाथ खडसे ठरवितात. एवढी मोनोपली जिल्‍हा बँकेत सुरू आहे. आपल्‍या मर्जीप्रमाणे कसे होईल; याकरीता खडसेंचा प्रयत्‍न असल्‍याने कॉंग्रेसचे उमेदवार त्‍यांनी ठरविल्‍याचा आरोप डी. जी. पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

SCROLL FOR NEXT