न्‍यायालयीन कोठडी 
महाराष्ट्र

जिल्‍हाधिकारींचे आदेश अन्‌ ग्रामसेविकेला न्‍यायालयीन कोठडी

जिल्‍हाधिकारींचे आदेश अन्‌ ग्रामसेविकेला न्‍यायालयीन कोठडी

Rajesh Sonwane

जळगाव : किन्ही (ता.भुसावळ) येथून बदली झाल्‍यानंतर आपल्या ताब्यातील दप्तर दिले नाही. आदेश दिल्‍यानंतर देखील दप्‍तर देण्यास टाळाटाळ करत असलेल्‍या ग्रामसेविकेला न्‍यायालयीन केाठडीत टाकण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांच्यावर जिल्हाधिकारी राऊत यांनी कठोर कारवाई केली आहे.

किन्‍ही येथील तत्‍कालिन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांनी चुंचाळे (ता. यावल) येथे बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४ वित्त आयोग, दलित वस्ती योजना याच्‍या कामाचे कोणतेही दप्तर दिले नाही. याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पाठपुरावा केला. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली. यात दहा दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. तरी देखील दप्तर न दिल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.

अखेर जिल्‍हाधिकारींची कठोर कारवाई

आदेश दिल्‍यानंतर देखील दप्‍तर न दिल्‍यो जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ग्रामसेविकेला एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या तक्रारीवरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामसेविका बाविस्कर यांना वारंवार सुचना देऊनही दप्तर न दिल्याने दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे निर्देश दिले आहे. याबाबतचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासगी क्लासच्या सहलींसाठी कडक नियमावली करा; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

CJP Shivaji Park Protest: अभिजीत दीपकेंसह 500 जणांविरोधात FIR; शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

महायुतीत मोठी बंडखोरी? पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटेंना अर्ज भरण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना?

SCROLL FOR NEXT