Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्‍ह्यात; मुक्ताईनगरात होणार सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्‍ह्यात; मुक्ताईनगरात होणार सभा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्‍याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता. २०) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. खडसेंच्‍या मुक्ताईनगरात (Muktainagar) त्‍यांची सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. तर पाळधी (ता. धरणगाव) येथे शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. (Jalgaon Eknath Shinde News)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना फुटीत मोठा पाठिंबा मिळाला. (Shiv Sena) शिवसेनेचे जळगाव ग्रामीणचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह आमदार चिमणराव पाटील (पारोळा), आमदार किशोर पाटील (पाचोरा), आमदार लता सोनवणे (चोपडा) व मुक्ताईनगरचे अपक्ष व शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील शिवसेनेतून शिंदे गटात सामील झाले होते. शिवसेनेचे सर्व आमदार शिंदे गटात गेल्यामुळे मोठे खिंडार पडले आहे. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा असा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी दीडला मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानातून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी दोनला जळगावकडे विमानाने प्रयाण, दुपारी तीनला जळगाव विमानतळावर आगमन, दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी पाळधी (ता. धरणगाव) येथे आगमन, दुपारी चारला पाळधी येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा, दुपारी साडेचारला पाळधीहून मुक्ताईनगरकडे प्रयाण, सायंकाळी साडेपाचला मुक्ताईनगर येथे आगमन, मुक्ताईनगरातील मैदानावर जाहीर सभा, रात्री सोयीनुसार मोटारीने जळगाव विमानतळाकडे रवाना, तेथून मुंबईकडे प्रयाण.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT