Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

कन्नड घाटात आढळला बेवारस मृतदेह

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : कन्नड घाटाच्या मेन बत्तीजवळील खोलदरीत एका ४२ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसात (Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news chalisgaon Unclaimed body found in Kannada Ghat)

चाळीसगाव- कन्नड दरम्यान असलेल्या कन्नड घाटातील मेन बत्तीजवळील पंधरा फूट खोल दरीत एका ४२ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवारी आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मृतदेहाला (Death) शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. परंतु सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस याचे तपास करीत आहे. तत्पूर्वी मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT