Crime News Saam tv
महाराष्ट्र

मित्राला मारहाण; विचारणा केल्‍याच्‍या रागातून केला खून

मित्राला मारहाण; विचारणा केल्‍याच्‍या रागातून केला खून

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : मुलाला मारहाण केल्याबद्दल विचारणा केल्याचा राग येऊन दोघांमध्ये झटापट होऊन एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना खरजई (ता. चाळीसगाव) गावातील बेघर वस्तीत २३ मार्चच्‍या रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी (Chalisgaon) मारेकर्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. (jalgaon news chalisgaon crime news young man murder)

खरजई गावातील प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे (हल्ली मुक्काम बायपास रोड, चाळीसगाव) याने आठ दिवसांपूर्वी पिंटू शिंदे याला मारहाण (Crime News) केली होती. पिंटूचा मित्र सतीश साहेबराव सोनवणे (वय ३२, रा. बेघर वस्ती, खरजई) हे दोघेही ट्रॅक्टर चालवत असून दोघेही मित्र आहेत. त्यामुळे आपल्या मित्राला का मारहाण केली, असे प्रवीण उर्फ मोन्या सोनवणेला सतीशने विचारणा केली. त्यामुळे दोघांमध्ये त्यावरुन बाचाबाची झाली.

सतीशच्‍या पत्‍नीलाही मारले

प्रवीण उर्फ मोन्या हा बाचाबाची दरम्यान शिवीगाळ करीत असल्याने सतीशच्या पत्नीने त्याला शिवीगाळ का करतो म्हणून विचारले असता, त्याचा राग येऊन त्याने सतीशच्या पत्नीला कानशीला लगावले. त्यामुळे पुन्हा सतीश व प्रवीण उर्फ मोन्या यांच्यात झटापट झाली. या झटापटीत प्रवीण उर्फ मोन्याने सतीशच्या पोटात धारदार (Murder) चाकू दोन- तीन वेळा खुपसला. सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर मारेकरी प्रवीण तेथून लगेचच फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या सतीशला तातडीने चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी मयत सतीशचा भाऊ संजय साहेबराव सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे याच्या विरोधात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुलेआम दारु विक्रीमुळे झाला खून

खरजई गावात सुमारे चौदा वर्षांपासून दारुबंदी होती. मात्र, काही दिवसांपासून बाहेरगावहून आलेल्या काही जणांकडून गावठी दारुची खुलेआम विक्री सुरु आहे. त्यामुळे गावातील शांततेला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने वेळोवेळी दारुबंदीचे ठराव देखील केले आहेत. मात्र, दारू विक्री करणारे स्थानिक पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचार्यांना हाताशी धरुन ही बिनधास्तपणे दारू विक्री करतात. ही खुनाची घटना देखील दारुमुळेच झाल्याचा आरोप असल्याने गावात पूर्वीसारखी दारूबंदी करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेल जेएनपीटी मार्गावर कारवर गर्डर कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Tharala Tar Mag! : सायलीला लागले डोहाळे, अर्जुन लाडक्या बायकोसाठी बनवतो लाडू; प्रियामुळे दोघांच्या आनंदाला लागणार ग्रहण | VIDEO

Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Nashik : नाशिकातील पर्यटनस्थळ बनतायत गुन्हेगारीचा अड्डा, भावलीत पर्यटकांवर हल्ला; ९ जणांवर गुन्हा

Bhajyachi Amti Recipe : वरण - भात कशाला? आजच बनवा ही झणझणीत भज्यांची आमटी

SCROLL FOR NEXT