Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News : देवदर्शनाला जाताना तरुणाचा मृत्‍यू; सेंधव्यात कारचा टायर फुटून अपघात

देवदर्शनाला जाताना तरुणाचा मृत्‍यू; सेंधव्यात कारचा टायर फुटून अपघात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सिहोरकडे (मध्य प्रदेश) निघालेल्या कारचे अचानक टायर फुटले. यामुळे झालेल्या अपघातात (Jalgaon) जळगावमधील तुकाराम वाडीतील २४ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाला. तर कार चालकासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले. (Accident) सूरज रामेश्वर जोमाळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

जळगावमधील तुकाराम वाडीतील सूरज जोमाळकर इतर पाच मित्रांसोबत शनिवारी (१५ जुलै) सकाळी सातच्या सुमारास कारने मध्य प्रदेशातील सिहोरला जाण्यासाठी निघाले. कारमध्ये चालकासह एकूण सात तरुण होते. सायंकाळी सेंधवा गावाजवळून पोहचल्‍यानंतर कारचे टायर फुटल्याने कार उलटली. या अपघातात सूरज जोमाळकर आणि त्याचा मित्र भावेश राक्षे (वय २१) व इतर सर्व गंभीर जखमी झाले.

उपचारादरम्‍यान झाला मृत्‍यू

कारमधील सर्व जखमींना जवळच्या एका हॉस्पिटमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सूरज जोमाळकर याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळबंली होती. मृत सूरज व जखमी झालेल्या तरुणांचे कुटुंब व नातेवाईक रात्री उशीरा सेंधव्याकडे पोहचले. तेथे पोचल्यावर सेंधवा पोलिसांकडे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली व मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT