Accident Saam tv
महाराष्ट्र

रक्षाबंधनाला नवीन कपडे घेवून दे म्‍हणाला अन्‌..बहिणीला भेटायला जात असताना अपघात

राखी बांधण्यापुर्वीच भावावर काळाचा घाला; बहिणीला भेटायला जात असताना अपघात

साम टिव्ही ब्युरो

पातोंडा (जळगाव) : येथून जवळ असलेल्या गॅस एजन्सीजवळ १५ ऑगस्‍टला दुपारच्या सुमारास बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात बहिणीला रक्षाबंधनासाठी भेटायाला जाणारा टोळी (ता. पारोळा) येथील तरुण मनोज युवराज पाटील (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला. (Jalgaon News Bus Bike Accident)

टोळी येथील मनोज पाटील हा सावखेडा येथे आपल्या बहिणीला भेटायला येत असताना गॅस एजन्सीजवळ इगतपुरी आगाराची चोपडा- नाशिक (Nashik) बसने (एमएच ४०, वाय ५९७७) अमळनेरकडे (Amalner)जाताना समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १९, डीजी ९०४५) जोरदार धडक (Accident) दिली. यात मनोज पाटील हा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आला. चोपडा -नाशिक बसचे चालक गोकुळ दौलत चौधरी (रा. मालेगाव) अमळनेर पोलिस ठाण्यात जमा झाला असून, पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील तपास करीत आहेत.

दोन बहिणींचा एकुलता भाऊ

मनोज पाटील हा एकुलता एक मुलगा व दोन बहिणींचा लाडका भाऊ होता. रक्षाबंधनानिमित्त बहिणीला भेटायला येत असताना मला नवीन कपडे घेऊन दे, असा दूरध्वनीवरून आग्रह धरला होता. परंतु बहिणीचे गाव अवघ्या तीन किलोमीटरवर असतानाच काळाने डाव साधला. मनोजचे आई, वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मनोज हा आपल्या कुटुंबाचा कमावता आधार होता. मनोजच्या निधनाची बातमी कळताच टोळी गावावर शोककळा पसरली. पातोंडा गावाजवळ अपघात झाल्याचे कळताच गावातील तरूण समाधान पाटील, रत्नाकर पवार, सोपान लोहार, महेंद्र पाटील, केतन ढिवरे, मंगेश पवार व तरुणांनी धाव घेत सहकार्य केले. समाधान पाटील याने अमळनेर पोलिस ठाण्यात व टोळी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT