Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: तापी नदीत उडी मारत वीटभट्टी मजुराने संपविले जीवन

तापी नदीत उडी मारत वीटभट्टी मजुराने संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : विदगाव येथील एका तरुणाने रविवारी (११ मे) दुपारी दोनच्या सुमारास पुलावरून तापी नदीत (Tapi River) उडी मारून आत्महत्या केली. सुमारे तासभर शोध घेतल्यावर तरुणाचा मृतदेह मिळून आला. पुनमचंद दगडू कुंभार (वय ३५, रा. विदगाव, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

जळगाव तालुक्‍यातील विदगावचा पूनमचंद कुंभार वीटभट्टीवर पत्नीसह मजुरी करतो. रविवारी दुपारी त्याने अचानक पुलावरून तापी नदीत उडी मारली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील पट्टीचे पोहणारे गुलशन नाईक, जनार्दन कोळी, कैलास झळके, अशोक कुंभार, जनार्दन कुंभार आदींनी त्याचा तासभर पाण्यात शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह हाती लागला. तत्काळ ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अस्‍पष्‍ट

जळगाव (Jalgaon) तालुका पोलिसांत (Police) आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृत पूनमचंद यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, आई, वडील, २ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. रुग्णालयात नातेवाईक, मित्रांनी गर्दी केली होती. पुनमचंदच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राहुल गांधींसह इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

बदलापूरमध्ये पाणी संकट; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या सोसायटीत कधी असणार पाणी बंद?

काँग्रेसचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड, राहुल गांधींनी केले दु:ख व्यक्त; राजकारणात हळहळ

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT