Dharangaon News Saam tv
महाराष्ट्र

Dharangaon News : पतंग उडवताना घडले दुर्दैवी; विद्युत तारांचा स्पर्श होऊन मुलाचा मृत्यू

Jalgaon News : वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे घरची परिस्थिती हलाखीची होती. दरम्यान २५ जानेवारीला संध्याकाळी लोकेश हा त्याच्या मित्रांसह पतंग उडवत होता

Rajesh Sonwane

जळगाव : आजही अनेक मुले पतंग उडविताना दिसून येत आहेत. यात सुटी असल्याने मित्र- मित्र पतंग उडवण्याचा आनंद घेत होते. मात्र या आनंदातच दुर्दैवी घटना घडली आहे. विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेला असता विजेचा जोरदार झटका बसल्याने १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घडली आहे. 

धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवाशी लोकेश सोपान पाटील (वय १५) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. लोकेश हा आई, वडील, लहान भाऊ, काका, काकू यांच्यासह पाळधी येथे वास्तव्यास होता. पाळधी येथे लोकेशचे वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे घरची परिस्थिती हलाखीची होती. दरम्यान २५ जानेवारीला संध्याकाळी लोकेश हा त्याच्या मित्रांसह पतंग उडवत होता.

पतंग काढण्यासाठी गेला
पतंग उडवत असताना लोकेशचा पतंग विद्युत तारांमध्ये अडकला. हा पतंग काढण्यासाठी लोकेश हा जवळच राहत असलेल्या त्याच्या मावशीच्या घराच्या गच्चीवर गेला. विद्युत तारांमध्ये अडकलेली पतंग खेचताना त्याला विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. हि घटना पाहून त्याच्यासोबत खेळत असलेले त्याचे मित्र घाबरून पळाले. 

कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश 

घटनेची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. काही क्षणात मुलासोबत होत्याचे नव्हते झाल्याने अनेकांचे अश्रू अनावर झाले होते. घटनेची पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

Farmer Scheme : फडणवीस सरकारकडून नव्या योजनेची घोषणा, 'या' शेतकऱ्यांना मिळणार २ लाख रुपये

Fatty liver disease: लिव्हरवर चरबी जमा झालीये? हे 5 बदल करा, मेणासारखं वितळेल फॅट

Sunita Ahuja: न गोविंदा, न मुलं… सुनीता आहूजाने एकटीनेचं केलं गणरायाचं स्वागत; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT