Jalgaon BJP 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी भाजपचा जनआक्रोश; राज्‍य शासनाचा केला निषेध

शेतकऱ्यांसाठी भाजपचा आक्रोश; राज्‍य शासनाचा केला निषेध

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. हा प्रश्‍न घेवून भाजपने राज्य शासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला. राज्‍य शासनाविरोधात प्रचंड घोषणबाजी करत भाजपने परिसर दणाणून सोडला. (jalgaon BJP's grand march for farmers protested against the state government)

शेतकऱ्यांना पूर्ण वीज माफी करण्यात यावी, आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात यावी; यासह विविध मागण्यांसाठी जळगाव भाजपतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ मैदानावरून या मोर्चास प्रारंभ करण्यात आला. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

हजारोच्‍या संख्‍येने कार्यकर्ते

भाजपतर्फे आयोजित शेतकरी जनआक्रोश मोर्चाला जिल्‍हाभरातून भाजप कार्यकर्ते हजर होते. यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. दिवाळी खरेदीसाठी रस्‍त्‍यांवर असलेल्‍या गर्दीत भाजप कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरल्‍याने कोर्ट चौक परिसरात प्रचंड ट्राफिक जाम झाली होती. रस्‍त्‍यावर अगदी पाय ठेवायला देखील जागा नसल्‍याने कोर्ट चौक परिसरातून निघण्यास अर्धा– पाऊण तास लागत होता.

भाजपच्‍या अशा आहेत मागण्या

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य शासनाने पंचनामे केले, पांढरे कागद काळे केले, शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केले. मात्र त्यांना एकही दमडी नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे आज शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांची यावेळी दिवाळी काळी असणार आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या निषेधार्थ तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी या मागणीसाठी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी 'हे' १ काम करा, रंगाचा डागही पडणार नाही अन् चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Salim Khan: सलीम खान यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले अमिताभ बच्चन अन् जावेद अख्तर; व्हायरल फोटचं नेमकं सत्य काय?

Viral Video: जवळ गेला, मुलीच्या कपड्यांना हात लावला आणि...! भर रस्त्यात तरूणाने मुलीची काढली छेड; व्हिडीओ व्हायरल

Raj Thackeray : 'सुख पाहता...' राज ठाकरेंनी सांगितली ३७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण, पोस्टमधून दिसली ती तळमळ

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात शिवसेना नगरसेवकांकडून गोंधळ

SCROLL FOR NEXT