BJP 
महाराष्ट्र

भाजपने फुंकला शंख..मंदिरे उघडण्यासाठी जळगावात शंखनाद

भाजपने फुंकला शंख..मंदिरे उघडण्यासाठी जळगावात भाजपकडून शंखनाद

Rajesh Sonwane

जळगाव : कोरोनाच्‍या प्रादुर्भावात मंदिरे बंद केली होती. परंतु, गेल्‍या दोन महिन्‍यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, या काळात सर्व सुरू झाले आहे. मात्र मंदिर उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. या विरोधात भाजपतर्फे राज्‍यव्‍यापी आंदोलन पुकारले आहे. त्‍यानुसार जळगावात देखील भाजपने राज्‍य सरकारच्‍या विरोधात शंख फुंकला. (jalgaon-news-BJP-blows-conch-shells-in-Jalgaon-to-open-temples)

कोरोना काळात मागील अनेक दिवसांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी आज जळगाव शहर भाजपच्यावतीने आंदोलन केले. जळगावात गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिरासमोर जळगाव शहर भाजपतर्फे आंदोलन केले. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद आंदोलन केले. यावेळी महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळेसह यांच्या शहर महिला आघाडी उपस्थित आहे.

उपासमारीची वेळ

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असताना देखील ठाकरे सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी दिलेली नाही. मंदिरे बंद असल्याने लाखो गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून भाजपतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपच्‍या कार्यकत्‍र्यानी राज्‍य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिवारवाड्यात आंदोलन! अनधिकृत पीर काढा, सकल हिंदू समाजाची मागणी|VIDEO

Sadhvi Pragya Controversy Statement: पळून जाणाऱ्या मुलींच्या तगड्या तोडा; साध्वी प्रज्ञासिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

Crime: बापाचं हैवानी कृत्य! ९ वर्षांच्या मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवत लैंगिक अत्याचार, नवी मुंबई हादरली

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्डीले कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

Diwali 2025: दिवाळीत या 6 वस्तूचे दान करू नका, गरीबी येईल घरात

SCROLL FOR NEXT