Birthday saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: अनोख्या वाढदिवसाची रंगलीय एकच चर्चा; जळगावात घोड्याचा वाढदिवस

अनोख्या वाढदिवसाची रंगलीय एकच चर्चा

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : लहान मुलांचे, नेते मंडळींचे वाढदिवस जोरदार साजरे केले जातात. परंतु, घोड्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. हे ऐकून नवलच वाटेल. पण हे खरं आहे. घोडा हा घरातला सदस्य असल्‍याचे मानून जळगावातील (Jalgaon) धनगर कुटूंबियांनी त्यांच्या घोड्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. या अनोख्या वाढदिवसाची जळगावात एकच चर्चा रंगलीय. (jalgaon news Birthday celebration of a horse in Jalgaon)

जळगाव शहरातील गोपाळपुरा परिसरात वास्‍तव्‍यास असलेले ज्ञानेश्वर अरुन धनगर यांचा मुलगा वैभवच्‍या वाढदिवशीच त्यांनी चंद्रपूरहून घोडा (Horse) खरेदी केला. घोड्याचा सांभाळ करत असतानाच त्याच्याविषयी लळा लागला. धनगर कुटुंबियांनी घोड्याचे नाव गुरू ठेवले. सात वर्षांच्या गुरूला त्यांनी नृत्य, दोन पायावर चालण्याचे प्रशिक्षणही दिले. लग्नांमध्येही गुरू वाद्यांच्या तालावर नृत्य करुन अनेकांच लक्ष वेधतो.

बॅनर लावून कापला केक

वैभवचा १५ जानेवारीला वाढदिवस. तर घोडा गुरूही आपल्या घरातील सदस्य आहे, आपला मुलगाच आहे असे मानत ज्ञानेश्वर धनगर यांनी घोडा गुरूचा जल्लोषात वाढदिवस साजरा केला. बॅनर लावुन आकर्षक पध्दतीने सजावट करत केक कापून धनगर कुटुंबाने गुरुचा जल्लोषात वाढदिवस साजरा केला. अशाप्रकारे जल्लोषात वाढदिवस साजरा करून धनगर कुटूंबियांनी एका घोड्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वाढदिवसाची पोस्‍ट सोशल मीडियावर (Social Media) व्‍हायरल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT