Soldier Death Saam tv
महाराष्ट्र

Soldier Death: बिडगावच्या जवानाला गुवाहटी येथे वीरमरण

बिडगावच्या जवानाला गुवाहटी येथे वीरमरण

साम टिव्ही ब्युरो

धानोरा (जळगाव) : बिडगाव (ता. चोपडा) येथील भूमिपुत्र व‌ इंडो- तिबेट बार्डर फोर्समध्ये (आयटीबीपी) कार्यरत असलेले जवान अशोक हिरामण पाटील यांना गुवाहाटी येथे वीरमरण आले. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना आसामच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी (ता. ६) त्यांची प्राणज्योत (Soldier Death) मालवली. आज बिडगाव (ता.चोपडा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Tajya Batmya)

बिडगाव (Jalgaon) येथील अशोक हिरामण पाटील (३५) हे अरुणाचल प्रदेश येथील युपिया येथे इंडियन तिबेट बार्डर फोर्स ३१ बटालियन येथे सेवेत होते. त्यांना पाच दिवसांपूर्वी डोक्यात त्रास होऊ लागला. तब्येत खालावल्याने (Aasam) आसाम येथील गुवाहाटीच्या सैनिक रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. ६) सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव गुवाटीहून विशेष विमानाने हावडा व तेथून इंदूर व वाहनाने बिडगाव येथे आणले जाणार आहे.

गावावर आज अंत्‍यसंस्‍कार

अशोक पाटील यांच्‍यावर आज (ता.८) दुपारपर्यंत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. हिरामण झावरू पाटील यांचा अशोक हा एकुलता मुलगा होता. अशोक पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालवण बाजारपेठेत आग लावून सलूनचे दुकान जाळले.

ओव्हरटेकवरून वाद... नंतर रागाने पाहिलं, नागपूरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT