Bhusawal Igatpuri Memu Train Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: भुसावळ- इगतपुरी मेमू दोन दिवस रद्द; इतर गाड्यांनाही दीर्घ थांबा

भुसावळ- इगतपुरी मेमू दोन दिवस रद्द; इतर गाड्यांनाही दीर्घ थांबा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून भुसावळ– इगतपुरी मेमू रेल्‍वे (Railway) गाडी सुरू केली आहे. परंतु, सदरची गाडी दोन दिवस रद्द करण्यात आली आहे. (Chalisgaon) चाळीसगाव स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचा गर्डर टाकण्यात येणार असल्‍याने गाडी रद! केली आहे. (Breaking Marathi News)

भुसावळ- इगतपुरी (Igatpuri) ही आज (१८ ऑक्‍टोंबर) आणि १९ ऑक्‍टोंबरची इगतपुरी– भुसावळ (Bhusawal) या दोन गाड्या रद्द असतील. यामुळे काही अप साईडच्या गाड्या वाघळी ते शिरसोली या दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर दोन तीन तास थांबविण्यात येणार आहेत. यामध्‍ये जम्मूतवी - पुणे एक्स्प्रेस (वाघळी स्थानक), पाटलीपुत्र- एलटीटी एक्सप्रेस (कजगाव स्थानक), गोरखपूर– पनवेल एक्स्प्रेस (गाळण स्थानक), गोरखपूर - एलटीटी एक्स्प्रेस (पाचोरा स्थानक), निजामुद्दीन वास्को एक्स्प्रेस (माहेजी स्थानक), गोरखपूर एलटीटी एक्स्प्रेस (शिरसोली स्थानक) तर गुवाहाटी एलटीटी एक्स्प्रेस जळगाव स्थानकावर थांबवण्यात येणार आहे.

डाउन साईडला जाणाऱ्या गाड्यांमध्ये एलटीटी- गोरखपूर एक्स्प्रेस (हिरापूर), एलटीटी- प्रयागराज एक्स्प्रेस (नायडोंगरी), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हावडा एक्स्प्रेस (पिपरखेड स्थानक) तर वॉस्को निजामुद्दीन एक्स्प्रेस नडगाव स्थानकावर थांबविण्यात येणार असल्याचे रेल्वेने कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT