nmu 
महाराष्ट्र

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला होतेय सुरवात; विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला होतेय सुरवात; विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

Rajesh Sonwane

जळगाव : विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांसाठीचे शैक्षणिक वर्षे २०२१-२२ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्‍यानुसार येत्या १ सप्टेंबरपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. (jalgaon-news-bahinabai-choudhary-north-maharashtra-university-collage-sylabus-start)

देशातील कोवीड- १९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत महाराष्ट्र शासन/ विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरू राहतील; अशा सूचना विद्यापीठाच्या या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व प्रभारी प्र- कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेला सुरवात

शुक्रवार अर्थात ६ ऑगस्टपासून पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाईल. १ सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाचे सत्र सुरू होईल.

असे आहे वेळापत्रक

या सत्राच्या परीक्षा १३ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ या दरम्यान घेतल्या जातील. १७ ते २३ जानेवारी २०२२ दरम्यान पुढील सत्राच्या तयारीचा कालावधी असेल. त्यानंतरचे सत्र २४ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. या सत्राच्या परीक्षा १ मे २०२२ ते ५ जून २०२२ या कालावधीत होतील. ६ जून ते १५ जून दरम्यान पुढील सत्राच्या तयारीचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर १६ जून २०२२ पासून पुढील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या या परिपत्रकात संबंधित महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळा आणि परिसंस्थांना कळविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT