Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

लग्‍नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

लग्‍नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शहरातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्याकडून पैसे देखील उकळले. याप्रकरणी जळगाव (Jalgaon) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news Atrocities on a young woman the lure of marriage)

यावल (Yawal) येथील विशाल राजेश तडवी (वय २३) या तरुणाने जळगावात महाविद्यालय शिक्षण घेत असलेल्या यावलमधील एका विद्यार्थिनीशी ओळख निर्माण केली. तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. यासाठी तरुणाने जळगाव शहरातील संभाजीनगरात भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला होता. त्यात २८ ऑक्टोबर २०१८ ते आजतागायत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्याकडे पैशाची मागणी केली.

पैसे देण्यास नकार दिल्‍याने जीवे मारण्याची धमकी

तरुणीने पैसे देण्यास नकार दिला असता तिला शिवीगाळ करून मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या पीडित तरुणीने जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस (Police) ठाण्यात गुरुवारी (ता. ५) फिर्याद देऊन या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या पाटोदा तालुक्यात अवकाळीने जांभूळ व केळी पिकांचं प्रचंड नुकसान

Suvarnadurga Fort : मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे सुवर्ण प्रतीक! सुवर्णदुर्ग किल्ल्याचे जुने नाव काय?

Diabetes Risk: या 6 सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, वेळीच व्हा सावध

Snake Eggs: घराजवळ किंवा बागेत दिसलेली अंडी सापाची की पक्ष्याची? 'या' सोप्या पद्धतीने ओळखा फरक; चुकूनही 'ही' चूक करू नका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT