Mahaganapati Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: महागणपतीला दीड लाख नाण्यांचा अभिषेक; देशातील सर्वात उंच गणरायाची प्राणप्रतिष्‍ठा

महागणपतीला दीड लाख नाण्यांचा अभिषेक; देशातील सर्वात उंच गणरायाची प्राणप्रतिष्‍ठा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पाळधीजवळ श्री सिद्धी महागणपतीचे मंदिर उभारण्यात आले आहे. या महागणपतीचा (Ganpati) प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यादरम्‍यान महागणपतीवर दीड लाख नाण्यांचा अभिषेक करण्यात (Jalgaon) आला. एक, दोन, पाच व दहा रुपयांची अशी जवळपास दीड लाख नाणी होती. ती साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक होती. (Breaking Marathi News)

पाळधी (जळगाव) येथील श्रीसिद्धी महागणपती मंदीरात ३१ फूट उंच मूर्तीच्या १६ दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात सोमवारी (२० फेब्रुवारी) १४ व्या दिवशी गणरायाला तब्बल दीड लाख रुपयांच्या नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. गणरायाच्या चरणी जमा झालेल्या चिल्लरचे आज भाविकांना वाटप केले जात आहे. दरम्यान २२ फेब्रुवारीला सोहळ्याची सांगता होणार आहे. आजवर १ लाखापेक्षा अधिक भाविकांनी (Mahaganapati) महागणपतीचे दर्शन घेतले आहे.

चिल्लरचा साचला थर

अभिषेकात एक व दोन, पाच, व दहा रुपयांच्या नाण्यासह काही चांदीच्या नाण्यांचाही समावेश आहे. ही सर्व नाणी भाविकांनी उत्सफूर्तेपणे मंदीराकडे भेट, देणगी म्हणून जमा केली आहेत. या अभिषेकासाठी दहा टाक्या भरून ही चिल्लर ठेवण्यात आली होती. ३१ फूटावरून यजमानांनी पाईपने केलेल्या अभिषेकाद्वारे चिल्लर गणरायाच्या अंगावर पडून पायाखाली चिल्लरचा सडा पडला होता. यानंतर चिल्लर जमा करून भरून घेण्यासाठी चार स्वयंसेवक कार्यरत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT