Student news 
महाराष्ट्र

महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन; हजर असूनही दाखविले गैरहजर

महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन; हजर असूनही दाखविले गैरहजर

संजय महाजन

अमळनेर : महाविद्यालयात हजर असूनही गैरहजर दाखवत काही विद्यार्थ्यांना प्रात्‍यक्षिकेत नापास केले. महाविद्यालयाच्‍या या प्रकाराबाबत विद्यार्थी आक्रमक झाले असून, त्‍यांनी आज महाविद्यालयाच्‍या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. तर एकाने येथे आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला असता पोलिसांनी त्‍यास ताब्‍यात घेतले. (jalgaon-news-amalner-pratap-collage-Student-agitation-in-front-of-the-college)

अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील टीवायबीएस्सीच्या तृतीय वर्षात काही विद्यार्थ्यांना हजर असूनही गैरहजर दाखवण्यात आले. काहींना प्रात्यक्षिक परीक्षेत नापास केले. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांचे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळांसह महाविद्यालय बंद आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण ही दिले जात आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अशात महाविद्यालयाच्‍या चुकांमुळे विद्यार्थींचे नुकसान होत असल्‍याचे या प्रकारातून समोर आले आहे.

महाविद्यालयाच्‍या विरूद्ध घोषणाबाजी

टीवायबीएस्‍सीच्या तृतीय वर्षात काही विद्यार्थ्यांना हजर असूनही गैरहजर दाखवण्यात आले. प्रात्यक्षिक परीक्षेत नापास केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही अशी भूमिका मांडून विद्यापीठाला योग्य निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसच्‍यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकत्‍र्यांकडून महाविद्यालयाविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT