Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: काही तरी गाजर दाखविल्‍यानेच प्रकल्‍प बाहेर गेला; अजित पवार यांचा आरोप

काही तरी गाजर दाखविल्‍यानेच प्रकल्‍प बाहेर गेला; अजित पवार यांचा आरोप

संजय महाजन

जळगाव : मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांनी हा प्रकल्प राज्यात आणावा; असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला. तसेच हा प्रकल्प बाहेर जात असेल तर कुठे तरी गाजर दाखवले जात असल्याचा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. (Jalgaon News Ajit Pawar News)

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज (ता. १५) जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत (Chalisgaon) चाळीसगाव, पाचोरा व जळगाव येथे मेळावे होणार आहेत. जळगावात आगमन झाल्‍यानंतर त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्‍हणाले, की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाबाबत राज्यात आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पडलेली होती. परंतु, राज्यात येणारा प्रकल्प हा दुसऱ्या राज्यात जात असेल तर हे कदापिही खपवून घेणार नाही. यामुळे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून काहीही करा पण हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणा असेही अजित पवार म्हणाले.

गाजर दाखविले

हा प्रकल्प बाहेर जात असेल तर कुठे तरी गाजर दाखवल जात असल्याचा आरोप करत हा प्रकल्प आधी आणावा आणि दुसरा प्रकल्प उभारायचा असेल तर उभारा. प्रकल्पासंदर्भात कुणीही राजकारण करू नये. राज्याच्या हिताचे जे जे प्रकल्प असतील ते प्रकल्प राज्यात आले पाहिजे; असे मत पवार यांनी व्‍यक्‍त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

पावसाळ्यात मिळणारी गावरान आघाड्याची भाजी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खातच राहाल

SCROLL FOR NEXT