Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्‍यू

भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

धरणगाव (जळगाव) : चोपडा रस्त्यावरील पिंपळे फाट्याजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) मोटारसायकलीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. (Jalgaon News Accident Two Death)

धरणगाव (Dharangaon) शहरातील संजयनगर भागातील रहिवाशी असलेले प्रदीप पाटील (वय २३) आणि किशोर पाटील (वय ३१) हे दोघेजण कामानिमित्त चोपडा (Chopda) येथे गेले होते. दुपारी चोपड्याहून परत येत असतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या (Petrol) पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच. १९, सीएच ३८९४) भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोघे तरुण मोटरसायकलसह फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, एकाच्या डोक्याचे तुकडे झाले. तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोन्याच्या दरात 3,666 रुपयांनी वाढ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर

सत्ताधारी पक्षाचा नेता शेतात तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; मुलगी चप्पल घेऊन पळाली, Video व्हायरल

भोंदू बाबा खरात प्रकरणाने महिलांचा मानसिक संतुलन ढासळलं; व्हिडिओ व्हायरलची भीती वाढली|VIDEO

Maharashtra Live News Update: पन्हाळ्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने निष्काळजीपणाचा कळस गाठला

Tandoor Paneer Tikka Recipe: रेस्टॉरंटस्टाईल तंदूर पनीर टिक्का घरी कसा बनवायचा? पाहा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT