Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: उपचारासाठी दाखल पतीचा डबा नेणाऱ्या पत्नीला मृत्‍यूने गाठले; भरधाव रुग्णवाहिकेची धडक

रुग्णालयात असलेल्‍या पतीचा डबा नेणाऱ्या पत्नीला मृत्‍यूने गाठले; भरधाव रुग्णवाहिकेची धडक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रुग्णालयात दाखल पतीसाठी जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या पत्नीला काही अंतरावरच मृत्‍यूने गाठले. गावातून बाहेर पडताच पायी चालत असलेल्‍या महिलेला रुग्णवाहिकेने धडक (Accident) दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी कुसुंबा गावात घडली. (Live Marathi News)

कुसुंबा (ता. जळगाव) येथील संगीता कैलास पाटील (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता पाटील या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह कुसुंबा येथे वास्तव्यास होत्या. दरम्‍यान कैलास पाटील यांची प्रकृती चांगली नसल्‍याने त्यांना जळगाव (Jalgaon) शहरातील खासगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले आहे. संगीता पाटील या आज सकाळी साडेआठच्‍या सुमारास सासू इंदुबाई यांच्यासोबत पतीचा जेवणाचा डबा घेवून घरून निघाल्या.

घरातून बाहेर पडल्‍या अन्‌

गावातून येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने त्‍यांना जोरदार धडक दिली. यात संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्‍यू झाला. एकीकडे मुलगा रुग्णालयात दाखल तर दुसरीकडे सुनबाईचा मृत्यू यामुळे इंदुबाई यांना मोठा धक्का बसला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्‍यानंतर तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी संगीताबाई यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: पोहायला गेला अन् परतलाच नाही! परळीत तरुण बेपत्ता

Maharashtra News Live Update: सुरांच्या राणी'चा सन्मान! अलका याज्ञिक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

PUC Rule Changes: खुशखबर! PUC नियम बदलणार, वाहनधारकांची झंझट मिटणार; नवीन वाहनांना मिळणार मोठी सूट

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतही राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे विरोधीपक्षनेते पद जाणार?

Pune Crime: बिल्डर अग्रवाल यांच्या मुलाच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सिया आणि चेतननं 14 जूनलाच आखला होता कट

SCROLL FOR NEXT