accident 
महाराष्ट्र

भीषण अपघात..ॲपेरिक्षाला ट्रकची धडक; तीघांचा जागीच मृत्‍यू

भीषण अपघात..ॲपेरिक्षाला ट्रकची धडक; तीघांचा जागीच मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जामनेर भुसावळ (Bhusawal) रस्त्यावर गारखेडाजवळ ॲपेरिक्षा व ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाला. ट्रकने दिलेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी मदत सुरू केली आहे. (jalgaon-news-accident-news-riksha-hit-by-truck-The-three-died-on-the-spot)

जामनेर (Jamner) ते गारखेडा दरम्यान सदर अपघात सकाळी झाला. लाकडाने भरलेला (एमएच. २१, ६०४५) या ट्रकने व प्रवासी घेऊन जात असलेली पॅजोरिक्षाला (एमएच १९, एई ९१५८) धडक दिली. या धडकेत पॅजो रिक्षातील ३ जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील चौघाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जी. एम. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्‍त प्रवाशी

एसटी सेवा बंद असल्‍याने खासगी प्रवाशी वाहतुकींशिवाय पर्याय राहिलेला नाही. खासगी वाहनधारक देखील क्षमतेपेक्षा जास्‍त प्रवाशी भरून प्रवाशी वाहतुक करत आहे. ॲपेरिक्षामध्‍ये देखील जास्‍त प्रवाशी बसविले जात आहेत. अशाच प्रकारे प्रवाशी भरून जात असलेल्‍या रिक्षाला धडक दिल्‍याने यात तीघांचा मृत्‍यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT