accident 
महाराष्ट्र

गाडी पलटी; सहाशे कोंबड्या घेऊन नागरिक फरार

गाडी पलटी; सहाशे कोंबड्या घेऊन नागरिक फरार

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील मुंबई- आग्रा महामार्गावरून मध्यप्रदेशच्या बडवानीकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनास कुत्रा आडवा आल्याने अपघात झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी वाहनातील कोंबड्या पळवून देण्यातच धन्यता मानली. अपघातग्रस्त पिकअप वाहनामध्ये जवळपास सहाशेहून अधिक कोंबड्या परिसरातील नागरिकांनी पळवून नेल्या आहेत. (jalgaon-news-accident-news-Overturned-and-Citizens-flee-with-six-hundred-hens)

मुंबई– आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून (Mumbai Agra Highway) शिरपूरकडून (Shirpur) बडवाणीकडे जाणाऱ्या पिकअप (एमपी ४६, जी. २१०५) हे कोंबड्या वाहतूक करणाऱ्या वाहनाचे राज्य सीमेवरील जामनिया शिवारात कुत्रा वाचवितांना चालकाचे नियंत्रण सुटले. यात पिकअप कठड्यावर आदळल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातात (Accident) वाहन मालक रोहित व चालक मोहम्मद जिलानी हे किरकोळ जखमी झाले.

नागरिकांची एकच गर्दी

अपघातग्रस्त वाहनात ६०० पेक्षा जास्त कोंबड्या असल्याने कोंबड्यांची लूटमार करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसून चालक व क्लिनर हे दोनही यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT