Accident Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon: भीषण अपघात; दोन सख्‍ख्‍या भावांचा मृत्‍यू

भीषण अपघात; दोन सख्‍ख्‍या भावांचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मध्‍यप्रदेशातून कामानिमित्‍ताने रावेर तालुका परिसरात आलेल्‍या दोन सख्‍ख्‍या भावांवर काळाने घाला घातला. अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत (Accident) दोन्‍ही भावांचा जीव गेला आहे. (Jalgaon Raver Accident News)

अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर महामार्गावर कर्जोत येथे आज दुपारी भीषण अपघात झाला. खंडवा (मध्य प्रदेश) येथील परीवार कर्जोत (ता. रावेर) येथे कामानिमित्त आला होता. मृत दोघांचे वडील भिक्षा मांगुन आपला जिवन चारिथार्त चालवितात. यात मजूरीचे काम करणारे सख्खे भाऊ ठार झाल्याची घटना दुपारी घडली आहे.

मयत झालेले सुनिल नारायण हरिजन (वय ३५) आणि अनिल नारायण हरिजन (वय २३) हे या भीषण अपघातात ठार झाले असून दोघांचे (Marriage) लग्न झाले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस ग्रामीण रुग्णालयात पोहचले असुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या भीषण अपघातात गरिब कुटुंबावर काळाचा घाला आल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT