Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: सोशल मीडियावरील मित्राकडून विवाहितेवर अत्याचार; मुलास मारायची धमकी

सोशल मिडीयावरील फ्रेण्डकडून विवाहितेवर अत्याचार; मुलास मारायची धमकी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगावातील विवाहितेची नंदुरबार (Nandurbar) येथील एकाशी फेसबुकवरून ओळखी झाली. त्यातून प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. यानंतर (Jalgaon News) समोरच्‍याने लहान मुलास मारून टाकण्याची धमकी देत संशयिताने पीडितेवर दोन वर्षे अत्याचार केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस (Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील ३२ वर्षीय विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्यास आहे. पती- पत्नी मोलमजुरी करून कुटुंबियाची गुजराण करतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी दीपक देवानंद टाक (रा. नंदुरबार) याच्याशी फेसबुकवर मैत्री झाली. मैत्रीतून ओळख आणि त्यातून दोघांचे प्रेम बहरले. दोघांच्या जळगावला पीडितेच्या घरी भेटीगाठी होत होत्या. भेटीदरम्यान संशयित दीपक याने विवाहितेशी बळजबरीने शारीरीक संबध प्रस्थापीत केले. संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संशयिताने पीडितेस (Crime News) दमदाटी करून मारहाण केली, तसेच बदनामीची धमकी देत पैशांची मागणी केली.

मुलास मारायची दिली धमकी

पीडितेने ओळखीच्या व्यक्तीद्वारे दीपक टाक यास वेळोवेळी पैशांची पूर्तताही केली. तरीही त्याचा त्रास कमी न होता, वाढतच गेला. पीडितेला त्रास असह्य झाल्याने तिने विरोध करण्यास सुरवात केली. दीपक टाक याने पीडितेच्या लहान मुलास मारून टाकण्याची धमकी देत अत्याचार सुरूच ठेवला. अखेर कंटाळून पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून संशयित दीपक टाक याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक शिल्पा पाटील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT