Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

संतापजनक..मूकबधिर असल्‍याची साधली संधी; रात्रीच्‍या अंधारात विवाहितेवर अत्याचार

संतापजनक..मूकबधिर असल्‍याची साधली संधी; रात्रीच्‍या अंधारात विवाहितेवर अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : भावाकडे राहत असलेल्या २५ वर्षीय मूकबधिर विवाहितेवर तिघांनी अमानुष अत्याचार (Crime News) केला. ही घटना तालुक्यातील एका गावात रविवारी (ता. ४) रात्री घडली. दरम्यान, सोमवारी पहाटे सुटका झाल्यानंतर ती घरी गेली. त्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस (Police) ठाण्यात तीन अनोळखी नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Live Marathi News)

पीडित २५ वर्षीय महिला पतीने घरातून काढून दिल्याने (Jalgaon) भावाकडे राहत होती. दरम्यान, पीडिता रविवारी (ता.४) रात्री आठच्या सुमारास जेवण करून गावातीलच भावाच्या दुसऱ्या घराकडे गेली असावी म्हणून कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पीडिताचा भाऊ कुटुंबासह शेतात कापूस वेचणी करण्यास गेला.

गावातील महिलेने सांगितले भावाला

सायंकाळी घरी येताना पीडितेच्या भावास एका महिलेने पीडित बहिण तुमच्या दुसऱ्या घरात झोपलेली असून, डोळे सुजलेले असल्याचे सांगितले असता भावाने व इतरांनी धाव घेऊन पीडितेला उपचारासाठी मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात आणले. डोळ्यास जास्त जखम झाली असल्याने तिला उपचारासाठी धुळे (Dhule) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्यासह मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली व घटनेचा पंचनामा केला.

दुचाकीवर नेऊन अत्याचार

पीडिता मूकबधिर असल्यामुळे व ती जखमी असल्याने पोलिसांनी तिचा जबाब घेण्यासाठी विशेष शिक्षिकेला पाचारण केले. विशेष शिक्षिकेसमोर इशाऱ्याने पीडितेने हा सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार गावातीलच तीन अनोळखी तरुणांनी दुचाकीवरून तिला गावाजवळील तलावाजवळ नेले. दोघांनी पीडितेस ओढाताण करून डोळ्यावर बुक्क्याने मारहाण केली. तर एकाने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचार करणारे समोर आल्यास त्यांना ओळखेल, असेही तिने जबाबात सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT