Jalgaon Load Shedding News, Jalgaon News Updates Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: जिल्‍ह्यातील २०७ फिडर भारनियमनाच्‍या छायेत

जिल्‍ह्यातील २०७ फिडर भारनियमनाच्‍या छायेत

Rajesh Sonwane

जळगाव : विजेची मागणी व पुरवठा यात होत असलेल्‍या तफावतीमुळे लाईन लॉसचे प्रमाण वाढले आहे. यामुळे राज्‍यभरात भारनियमनाचे संकट उभे आहे. निम्‍मा जळगाव जिल्‍हा हा भारनियमनाच्‍या छायेत असून जळगाव (Jalgaon) शहरातील तब्‍बल १२ फिडर व जिल्‍ह्यातील २०७ फिडर भारनियमनाच्‍या छायेत आहेत. (jalgaon news 207 feeder load shedding in the district)

उन्‍हाळा सुरू झाला असून एप्रिलमध्‍येच तापमानाने चाळीशी ओलांडली असून सध्‍या जिल्‍ह्यातील तापमानाचा पारा हा ४५ अंशाच्‍या जवळ आहे. उन्‍हाची तीव्रता जशी वाढली तसे कुलर, पंखे, एसी सुरू झाले. यामुळे विजेची मागणी अधिक वाढली आहे. यामुळे सद्य:स्थितीला मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. परिणामी भारनियमनाचे संकट उभे राहिले आहे. याची वेळ निश्‍चीत नसली तरी आपत्कालीन भारनियमन सुरू झाले आहे.

आपत्कालीन भारनियमनाचा झटका

महावितरणकडून (MSEDCL) सद्य:स्थितीत वीज तुटवड्यामुळे आपत्‍कालीन भारनियमन सुरू केले आहे. सध्‍या होत असलेल्‍या भारनियमनाचा कालावधी अद्याप निश्‍चीत नाही. परंतु साधारण हे भारनियमन ४ तास ४५ मिनिटांपासून ९ तास १५ मिनीट अशा प्रकारे होवू शकते. ‘ए’ ते ‘जी ३’ अशा गटांमध्‍ये फिडरची विभागणी करण्यात आली आहे. सध्‍याचे भारनियमन हे जी १ ते जी ३ या गटात येत असलेल्‍या फिडरवर होत आहे.

जिल्‍ह्यातील तब्‍बल २०७ फिडरवर छाया

जळगाव जिल्‍ह्यात २९६ फिडर आहेत. यापैकी तब्‍बल २०७ फिडर हे भारनियमनाच्‍या छायेत आहेत. तर जळगाव शहरात असलेल्‍या ३५ पैकी १२ फिडरवर आपत्कालीन भारनियमन केले जात आहे.

हे फिडर भारनियमनाच्या छायेत

जळगाव शहरातील जी १ मधील शास्‍त्री टावर, हरिविठ्ठलनगर, ‘जी २’ मधील मेहरूण, बहिणाबाई उद्यान, विठ्ठल पेठ व ‘जी ३’ गटातील गणपतीनगर, गायत्रीनगर, शिवतीर्थ मैदान, बळीराम पेठ, प्रजापतनगर, हुडको व खंडेरावनगर असे बारा फिडर भारनियमनाच्‍या छायेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्याकडून भारताला धक्का, पाकिस्तानसोबत मोठा करार; म्हणाले - इंडियाला PAK कडूनही तेल खरेदी करावे लागेल...

जागेचा वाद टोकाला! महिलेच्या झिंज्या धरत तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; घटनेचा VIDEO व्हायरल

Raanjhanaa : सोनम कपूरचा 'रांझणा' पुन्हा प्रदर्शित होणार; AIनं चक्क क्लायमॅक्स बदलला, रिलीज डेट काय?

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Maharashtra Live News Update: नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू

SCROLL FOR NEXT