Jalgaon ncp Jalgaon ncp
महाराष्ट्र

गॅस सिलेंडर, चारचाकीची अंत्‍ययात्रा; मुक्‍ताईनगरात राष्‍ट्रवादीतर्फे आंदोलन

गॅस सिलेंडर, चारचाकीची अंत्‍ययात्रा; मुक्‍ताईनगरात राष्‍ट्रवादीतर्फे आंदोलन

संजय महाजन

मुक्‍ताईनगर (जळगाव) : पेट्रोल– डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर व फोर व्हीलरची प्रतीकात्मक अंत्‍ययात्रा काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी या अंत्ययात्रेत उपस्थित होते.

गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर सातत्‍याने वाढत आहेत. केंद्र सरकारकडून ही दरवाढ कमी केली जात नाही. यामुळे जनसामान्‍यांमधून रोष व्‍यक्‍त केला जात आहे. राजकिय पक्षांकडून देखील आंदोलन केले जात असून, आज राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडून आंदोलन करत प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा काढण्यात आली.

रोहिणी खडसेंनी दिला खांदा

‍अंत्ययात्रेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडन केले. तसेच शिकाळ हातामध्ये पकडून परिवर्तन चौकामध्ये अंत्ययात्रेतील तिरडी खाली ठेवून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेत्‍या रोहिणी खडसे यांनी तिरडीला हार अर्पण केला. रोहिणी खडसे यांनी सिलेंडर गॅस तिरडीला खांदा देत तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला.

तहसिल कार्यालयासमोर ठिय्या

मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्‍वेता संचेती यांनी गेटवर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे आंदोलन करते गेटवर घोषणाबाजी देत ठिय्या मांडून बसले होते. आंदोलन चिघळण्याचे लक्षात येतात श्वेता संचेती यांनी गेटवर येऊन रोहिणी खडसे यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले. यावेळी हजारोच्‍या संख्‍येने कार्यकर्ते हजर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT