Jamner News Saam tv
महाराष्ट्र

Jamner News : रक्षाबंधनाला माहेरी आली, रात्रीच्या अंधारात घडलं भयंकर; विवाहितेच्या मृत्युने जामनेर तालुक्यात खळबळ

Jalgaon News : गोंदेगाव येथे पती, २ वर्षांचा मुलगा यांच्यासह वास्तव्यास होत्या. दरम्यान १९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने तीन दिवस अगोदरच पिंपळगाव कमानी येथे आई- वडिलांकडे माहेरी आल्या होत्या

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : काही दिवसांवर रक्षाबंधन असल्याने सासरी गेलेल्या बहिणी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी माहेरी येत असतात. अशाच प्रकारे रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या एका विवाहित बहिणीवर मात्र काळाने घाला घातला आहे. रात्री घरात असताना सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथे घडली आहे.

जामनेर (Jamner News) तालुक्यातील गोंदेगाव तांडा येथील पुजा काशिनाथ पवार (वय २१) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गोंदेगाव येथे पती, २ वर्षांचा मुलगा यांच्यासह वास्तव्यास होत्या. दरम्यान १९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने तीन दिवस अगोदरच पिंपळगाव कमानी येथे आई- वडिलांकडे माहेरी आल्या होत्या. दरम्यान १६ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास सर्वजण घरात असताना पूजा पवार यांना हाताला सर्पदंश (Snake Bite) झाला. काहीतरी चावल्याचे पूजा यांच्या लक्षात आले. 

दरम्यान हातावरील दंशाची निशाणी पाहून सापाने दंश केल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने पूजा पवार यांना पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र  वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासून पूजा यांना मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तीन वर्षांपुर्वीच पूजाचे लग्न झाले होते. या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT