Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon News : मागणी केल्यानुसार या दोघांना सुनील पाटील यांनी १० ते १६ फेब्रुवारीदरम्यान जळाऊ इंधन व मका काढून त्याचा सुकलेल्या कणसांचा पुरवठा केला

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : जामनेर येथील व्यापाऱ्याकडून जळाऊ इंधन घेतल्यानंतर त्याची रक्कम अदा करण्यात आली नाही. व्यापाऱ्याकडून या रक्कमेची वारंवार मागणी करून देखील रक्कम देण्यात आली. यात व्यापाऱ्याची १२ लाख ७१ हजारात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

जामनेर (Jamner) येथील व्यावसायिक असलेले तक्रारदार सुनील विठ्ठल पाटील यांचा जामनेर येथे औद्योगिक वसाहतीत फर्म आहे. कारखान्यांना लागणारे जळाऊ इंधन पुरवठा केला जात असतो. हे इंधन लागणार असल्याने प्रल्हाद लक्ष्मण मारसकोळे व वैभव जपूरकर (दोन्ही रा. नागपूर) यांनी सुनील पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मागणी केल्यानुसार या दोघांना सुनील पाटील यांनी १० ते १६ फेब्रुवारीदरम्यान जळाऊ इंधन व मका काढून त्याचा सुकलेल्या कणसांचा पुरवठा केला. साधारण याची किंमत १२ लाख ७१ हजार रुपये होती.

दरम्यान पुरवलेल्या मालाच्या रकमेची सुनील पाटील यांनी वारंवार मागणी केली. मात्र मागणी करूनही (fraud) समोरच्यानी पैसे दिले नाही. यामुळे नागपूरच्या दोघांविरोधात सुनील पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : आपला भिडू बच्चू कडू... बच्चू कडू पाचव्यांदा आमदार होणार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज

Bhiwandi West Exit Poll: भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप की काँग्रेस कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल होणार आमदार? पाहा Exit Poll

Pune Crime: पुण्यात नववीत शिकणाऱ्या मुलाचा गळा चिरला, १४ वर्षीय पोराचं धक्कादायक कृत्य

Bhosari Exit Poll : भोसरीचा आमदार कोण? एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार धक्का!

SCROLL FOR NEXT