Jamner News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : घरातून बाहेर पडताच तरुणाला बसने उडवलं, मन सुन्न करणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Jalgaon News : आई, वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी, चार भाऊ यांच्यासह गावात वास्तव्यास होता. तो जामनेरमधील एका खासगी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियागृह विभागात सहाय्यक म्हणून कामाला होता

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला. कामावर जात असताना घरातून सर्वांचा निरोप घेतला. गावापासून काही अंतरावर गेल्यावर भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील गोदरी येथे घडली. 

गोदरी (ता. जामनेर) येथील निलेश तुकडसिंग नाईक (वय २७) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे. आई, वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी, चार भाऊ यांच्यासह गावात वास्तव्यास होता. तो जामनेरमधील (Jamner) एका खासगी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियागृह विभागात सहाय्यक म्हणून कामाला होता. दरम्यान रोजप्रमाणे रविवारी निलेश हा दुचाकीने कामावर जाण्यासाठी सकाळी साडेसातला घरातून निघाला. गाव सोडल्यावर काही अंतरावर राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगाराच्या बसने जोरदार धडक (Accident) दिली. 

बसने धडक देताच निलेश हा खाली फेकला गेला. तर धडकेमध्ये त्याची दुचाकी दूरवर फरफटत गेली. निलेश खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान फत्तेपुर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे त्याला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात आकोश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT