Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोनजण जखमी

Jalgaon Erandol News : एरंडोल- म्हसावद रस्त्यावर घडलेल्या दुचाकींच्या अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एकाच मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Rajesh Sonwane

जळगाव : एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना म्हसावद रस्त्यावरील पद्मालय फाट्याजवळ घडली आहे. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

एरंडोल- म्हसावद रस्त्यावर घडलेल्या दुचाकींच्या अपघातात पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथील संजय माणिक पवार (वय ६०) असे मृत झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. संजय पवार हे सोमवारी दुपारी एकच्या सुमारास एरंडोलकडे जात होते. त्याचवेळी म्हसावदकडे भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाने संजय पवार यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर फेकले गेले. 

रस्त्यावर फेकले गेल्याने वृद्धाचा मृत्यू 

संजय पवार यांच्यासह संजय नामदेव कोळी व बाळा पंकज कोळी हे रस्त्यावर फेकले गेले. यात संजय पवार यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय कोळी व बाळा कोळी गंभीर जखमी झाले. यावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र संजय पवार यांचा मृत्यू झाला. तर जखमींवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. 

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
पारोळा तालुक्यातील सार्वे येथून गेलेल्या महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आदिल उर्फ पप्पू शकील खाटीक (वय २९) असे मृताचे नाव असून रस्त्याने चालत असताना त्याला अज्ञात वाहनावरील चालकाने भरधाव वेगाने धडक दिली. ज्यात आदिलला जबर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत ईस्माइल फकरुद्दीन खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT