Erandol Accident Saam tv
महाराष्ट्र

Erandol Accident : काही अंतरावर घर असतानाच दोघांना मृत्यूने गाठले; भरधाव टँकर काळ बनून आला

Jalgaon News : जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाल्याने जखमींला ग्रामीण रुग्णालयात नेत असताना, त्याचाही मृत्यू

Rajesh Sonwane

एरंडोल (जळगाव) : रात्री घरी जाण्यासाठी दुचाकीने निघालेल्या दोघांना भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दुचाकीला धडक दिल्यानंतर टँकरसह चालक फरार झाला असून अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला. 

एरंडोल येथे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अमळनेर नक्याजवळ  अपघात झाला. यात राजेंद्र भिला भोई (वय ४६) आणि दीपक रामकृष्ण भोई (वय ४४, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे दोघे दुचाकीवरून जात होते. याचवेळी जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाल्याने जखमींला ग्रामीण रुग्णालयात नेत असताना, त्याचाही मृत्यू झाला. 

अपघातात मृत झालेले दोघेही जवळचे नातेवाईक होते. बसस्थानकापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर अपघात झाल्यामुळे नागरिकांनी अपघातस्थळी लागलीच गर्दी करून मदत कार्य सुरू केले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. महामार्गावरच अवजड वाहन आडवे लावून वाहतूक रोखून धरली. 

यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याठिकाणी यापूर्वीही अनेकवेळा अपघात झाले असून, अपघाती जागा म्हणून या जागेची ओळख झाली आहे. अमळनेर नाका येथून नवीन वसाहतींमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. महिन्यापूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन युवक ठार झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका परिसरात अंडरपास करावा अथवा उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT