Jalgaon Crime News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! ५ महिन्यापासून शाळकरी मुलीवर बलात्कार, ६ जणांना अटक

बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : मागील ५ महिन्यापासून इयत्ता ७ वीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीचे गावातील (village) ३ तरुणांनी बलात्कार केल्याची घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर या पोलीस (Police) ठाण्याच्या अंतर्गत घडली आहे. या घटनेत ३ आरोपींसह (accused) त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य ४ जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील पाहा-

पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता ७ वीमध्ये शिकणाऱ्या मुलीची गावातील एका तरुणाबरोबर ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत या तरुणाने मुलीला गावाबाहेर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर देखील आरोपीने तिच्यावर बलात्कार (sexual assualt) करणं सुरूच ठेवले होते. या घटनेविषयी आरोपी तरुणाने इतर २ मित्रांना देखील या प्रकारची माहिती दिली. तरुणाने त्याच्या मित्रांना माहिती दिल्यावर ते तरुण त्याच्यावर नजर ठेऊन होते. या दोघा तरुणांनी आपण गावात सगळ्याचा याविषयी सांगू अशी धमकी देत या मुलीवर बलात्कार करत असत.

मागील ५ महिन्यांपासून हे तिघेही तरुण या मुलीवर सतत बलात्कार करत होते. शुक्रवारी रात्री ९ वाजता मुलगी घराच्या बाहेरून अचानक गायब झाली आणि रात्री उशिरा घरी परतल्यावर आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारले असता, हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसात या तिन्ही तरुणानी तिच्यावर बलात्कार केला आहे. आता हा त्रास असह्य झाल्याच सांगत मुलीने घडला प्रकार आपल्या आईवडिलांच्या कानावर घातला आहे.

यामुळे मुलीवर बेतललेल्या या प्रसंगानंतर आईवडिलांनी आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेशवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेत पीडितने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३ तरुणांना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात पोक्सो, अॅट्रो सिटी आणि बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

SCROLL FOR NEXT