Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पाणी पुरवठ्याचे पाइप जेसीबीने काढून चोरी; सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Jalgaon News : गिरणा पंपिंग प्लांटवरून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र सध्या ही पाणी योजना बंद आहे.

संजय महाजन

जळगाव : जळगाव शहराला गिरणा पंपिंग प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत असतो. यात गिरणा पंपिंगपासून करण्यात आलेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप जेसीबीद्वारे काढून चोरी करण्यात येत होती. हे पाईप नेतानाच दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव शहरातील सदरचा धक्कादायक प्रकार हा गिरणा पंपिंग रस्त्यावर आर्यन पार्कसमोर भरदिवसा सुरू होता. गिरणा पंपिंग प्लांटवरून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र सध्या ही पाणी योजना बंद आहे. दरम्यान गिरणा पंपिंग रस्त्यावर जेसीबीद्वारे चारी खोदून याठिकाणी टाकलेले बीड धातूचे पाइप काढण्यात येत होते. याबाबतची माहिती ठेकेदार यांनी जळगाव मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांना दिली. 

मनपा कराचार्यानी पाईप घेतले ताब्यात 

सदर प्रकारची लागलीच दखल घेत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी पंप अटेंडंट कर्मचारी यांना लागलीच त्याठिकाणी पाठविले. यावेळी या कर्मचाऱ्यांना दोन जेसीबीच्या साहाय्याने जुनी पाइपलाइन खोदून बीड धातूचे पाइप काढत असताना आढळून आले. कोणतीही परवानगी न घेता पाईपलाईन काढण्यात येत असल्याचे समोर आले असून मनपा कर्मचाऱ्यांनी हे पाईप जप्त केले आहेत. 

चार जण पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान परवानगी न घेता पाईप काढण्यात येत असल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT