Jalgaon Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime: जळगावात 'सैराट'चा थरार! प्रेमप्रकरणातून भावाने बहिणीसह प्रियकराला संपवलं

खून केल्यानंतर भाऊ पिस्तूलासह पोलीस ठाण्यात हजर

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव - चोपडा शहरात प्रेमप्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आल्याने जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणाची बंदुकीने गोळी मारून तर तरूणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या (Police) चौकशीत समोर आले आहे. तरुणीच्या १७ वर्षीय अल्पवयीन भावानेच दोघांचा जीव घेतल्यानंतर तो स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडा लगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले आहे. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितास ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरु आहे.

प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत तरुणीचा संशयित अल्पवयीन भावानेच दिलेल्या फिर्यादी नुसार चार जणांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT